2know.in ब्लॉगला २ वर्ष पूर्ण (वाटचाल, आढावा)
आज 2know.in या आपल्या आवडत्या ब्लॉगला, साईटला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या प्रवासात आपण 2know.in ला जे भरभरुन प्रेम दिलंत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. २ वर्ष पूर्ण होत असल्या निमित्त, आपण 2know.in च्या वाटचालीचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी मी २०१० व २०११ या वर्षांतील 2know.in चा तुलनात्मक तक्ता तयार केला आहे. त्यामुळे थोडक्यात आपल्याला 2know.in च्या वाटचालीचे स्वरुप समजेल. त्यानंतर आपण आर्थिक आणि भावनिक दृष्टिकोनातून 2know.in चा प्रवास पाहणार आहोत. त्यावरुन 2know.in संदर्भातील गोष्टींचा एकंदरीत अंदाज येईल. याचा जुन्या आणि नव्या मराठी ब्लॉग लेखकांना नक्की उपयोग होईल. पुढील वाटचालीची दिशा कोणती असावी? हे देखील यातून ठरवणं आपल्याला सोपं जाईल. तर खाली मी 2know.in च्या मागील दोन वर्षांतील वाटचालींची तुलना करणारा तक्ता देत आहे.




