अपल्या ब्लॉगस्पॉट ब्लॉगला नवीन डोमेन नेम कसं द्याल!?

जपासून 2know.in या वेबसाईटला अत्यंत उत्साहाने सुरुवात होत आहे. ही सुरुवात करत असतानाच मला आतून अगदी हर्ष जाणवत आहे. दोन वर्ष झाली मी इंटरनेट या माध्यमाच्या अधिक जवळ येऊन आणि आता मला याबाबत इतकी सारी माहिती आहे की, त्यावर मी ५००० आर्टिकल्स तरी सहज लिहू शकेन.

आजचा पहिला लेख आहे तो आपल्या ब्लॉगस्पॉट ब्लॉगला नवीन डोमेन नेम कसं द्याल? यावर.

१. एक नवीन डोमेन नेम विकत घ्या. क्रेडिट कार्ड वापरत असाल तर प्रत्यक्षात Google, yahoo अथवा Godaddy यावरून तुम्ही ते विकत घेऊ शकाल. जर तुम्हाला इंटरनेट बॅंकिंग अथवा चेकची सुविधा हवी असेल तर rediff, indiatimes अशा वेबसाईट्स मार्फत तुम्ही डोमेन नेम विकत घेऊ शकाल. पण तिथे SBI ची इंटरनेट बॅंकिंग सुविधा नाहिये. खूप म्हणजे खूप शोध घेतल्यानंतर मला SBI इंटरनेट बॅंकिंगची सुविधा असलेली वेबसाईट सापडली. domainz.in या वेबसाईटवर तुम्ही अगदी कोणत्याही माध्यमातून डोमेन नेम विकत घेऊ शकता. पण या वेबसाईटवर तुम्हाला स्वतःला ANAME आणि CNAME बदलण्याची सुविधा उपलब्ध नाहिये. त्यासाठी तुम्हाला त्याच्या सपोर्टशी संपर्क साधावा लागेल. डोमेन नेमची किंमत ही .in .org .com .net .biz  इ. निरनिताळ्या एक्सटेंन्शन्स साठी निरनिराळी असते. याबरोबरच तुम्ही कोणाकडून ते रजिस्टर करत आहात? यावरही काहीप्रमाणात अवलंबून असते. पण २५० रु. ते जास्तितजास्त ८०० रु. पर्यंत तुम्हाला तुमचे डोमेन नेम मिळून जाईल हे नक्की. शक्यतो ते ५०० रु. च्या आसपास असते. ही किंमत त्या नावाच्या एक वर्षाच्या हक्कांसाठीची असते. एक वर्षानंतर तुम्हाला परत त्यासाठी तेव्हढीच किंमत चुकवावी लागते.

२.तर आता तुम्ही डोमेन नेम विकत घेतलं आहे. आता ब्लॉगच्या सेटिंग्ज (settings) वर क्लिक करा. आणि मग पब्लिशिंग (publishing) वर क्लिक करा.

३. Switch to: Custom Domain वर क्लिक करा. त्यानंतर Switch to advanced settings वर क्लिक करा.

४.आता डोमन नेम तुम्ही जिथून विकत घेतले आहे, त्याचे कंट्रोल पॅनेल ओपन करा. तिथे DNS (Domain Name System) मॅनेजमेंट वर जा.

5. आता ANAME आपल्याला बदलायचे आहे.  तुमचे डोमेन खालील ip addresses ना point करा. म्हणजेच आपल्याला एक ip addresses point करण्यासाठी एक रिकामी जागा दिसेल. त्या तिथे ते टाका आणि सेव्ह करा. खालील चार ip addresses असं चारवेळा करा. 

216.239.32.21 
216.239.34.21 
216.239.36.21 
216.239.38.21

 ६. आता CNAME मॉडिफाय करा. तिथे NAME च्या रखान्यात www टाईप कारा. आणि value च्या ठिकाणी ghs.google.com टाका. आता परत ब्लॉगग्जच्या सेटिंग्ज वर या. your domain च्या समोर www सहित तुमचा डोमेन चा ऍड्रेस टाईप करा. settings सेव्ह करा. आणि झालं!!!!

७. आता दहा मिनेटे वाट पहा. दहा मिनिटांनंतर तुमचा डोमेन ऍड्रेस टाईप केल्यानंतर तुमचा ब्लॉग ओपन झाल्याचे तुम्हाला दिसून येईल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.