ओपेरा मिनी मोबाईलवर मराठी वेबसाईट कशी वाचता येईल?

कालपर्यंत हा माझ्यासमोरचा एक खूप मोठा प्रश्न होता. माझ्या Nokia N70 मोबाईलवर देवनागरी फंट्स सपोर्ट करत नाहित. त्यामुळे कोणतीही मराठी अथवा हिंदी वेबसाईट मी त्यावर पाहू शकत नाही. त्यासाठी मी सगळीकडे खूप शोधाशोध केली, पण हाती काहीही लागले नाही. त्यामुळे कृपया देवनागरी फंट्स मोबाईलवर इंस्टॉल करण्याबाबत तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती तुम्ही मला आणि वाचकांना सांगा. पण तोपर्यंत मराठी वेबसाईट ओपेरा मिनीवर कशी पाहता येईल? हे मी सांगणार आहे.

कालच एका फोरमवर मला यासंबंधीची पडताळून पाहिलेली विश्वसनीय माहिती सापडली आहे आणि तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.

१. ओपेरा मिनी उघडा.
२. ऍड्रेस बारमध्ये opera:config टाईप करा. आणि त्यावर जा.
३. तिथे तुम्हाला एक सेटिंग पेज दिसून येईल. सर्वांत खाली एक ऑपशन आहे “Use bitmap fonts for complex scripts”, तिथे No च्या ठिकाणी Yes करा.
४. आता ‘सेव्ह’ करा.

आता देवनागरी लिपीतील मराठी वेबसाईटही तुम्हाला अगदी चांगल्या रीतीने वाचता येईल.

तोटा: या प्रक्रियेनंतर एखादी वेबसाईट ओपन होण्यासाठी मेमरी थोडी अधिक वापरली जाते.

उपाय: या ट्रिकचा अमर्याद आनंद लुटण्यासाठी मोबाईल इंटरनेटचा अनलिमिटेड डाटा प्लॅन निवडा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.