कोणताही व्हिडिओ फॉरमॅट दुस-या कोणत्याही व्हिडिओ फॉरमॅटमध्ये कसा कन्व्हर्ट कराल?

बरेचदा असं होतं की एखाद्या व्हिडिओ फॉरमॅटला एखादा व्हिडिओ प्लेअर काही अंशी अथवा पूर्णपणे सपोर्ट करत नाही. मग? त्यासाठी दुसरा एखादा व्हिडिओ प्लेअर डाऊनलोड करावा लागतो. जसं की AVI व्हिडिओ फॉरमॅटला तुमच्या मोबाईलचा डिफॉल्ट व्हिडिओ प्लेअर (रिअल प्लेअर) सपोर्ट करणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्मार्टमुव्ही प्लेअरच तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घ्यावा लागेल. मग हा स्मार्टमुव्ही प्लेअर तुम्हाला विकत तरी घ्यावा लागेल अथवा त्याचा क्रॅक शोधावा लागेल. हे जसं मोबाईलबाबत लागू होतं तसंच ते कॉंम्प्युटरबाबतही लागू होतं. या समस्येवर दुसरा एक चांगला उपाय आहे, तो म्हणजे ‘तो’ ओरिजनल व्हिडिओच अशा फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करायचा, की ज्याला तुमचा डिफॉल्ट व्हिडिओ प्लेअर सपोर्ट करेल.

एनी व्हिडिओ कन्व्हर्टर” हे शीर्षकामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे मोफत आणि दर्जेदार उत्तर आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला अगदी मोफत डाऊनलोड करुन घेता येईल. ते टिकाऊ आहे, बिघडत नाही, हॅंग होत नाही आणि अतीशय जलद गतीने एका व्हिडिओ फॉरमॅटचे दुस-या व्हिडिओ फॉरमॅटमध्ये कन्व्हरजन करते. हा कन्व्हरटर जवळपास सगळे व्हिडिओ फॉरमॅट्स एकमेकात कन्व्हर्ट करु शकतो. जसं DivX, XviD, MOV, rm, rmvb, MPEG, VOB, WMV, AVI to MPEG-4 movie format for smart phone, FLV, AVI and MPEG-1, MPEG-2 etc. etc. व्हिडिओचे कन्व्हरजन करत असताना तुम्ही व्हिडिओची स्क्रिन साईझही ठरवू शकता आणि ऑडिओ-व्हिडिओ चा Codec, bitrate याचे नियंत्रणही हवे असल्यास तुम्ही हातात घेऊ शकता. याशिवाय video framerate, audeo samplerate इ. इ. नियंत्रणाच्या सुविधाही आहेतच.

या सॉफ्टवेअरचा उपयोग फक्त इथेच थांबत नाही! याचा वापर करुन तुम्ही YouTube, Google Video, MetaCafe आणि Nico Video येथे उपलब्ध असलेला कोणताही ऑनलाईन व्हिडिओ अगदी मोफत डाऊनलोड करु शकता. आणि तेही तुम्हाला हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये.

साधी-सोपी व्हिडिओ कन्व्हरजनची कृती ~ (सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर)
१. Add Video वर क्लिक करुन आपल्याला कन्व्हर्ट करण्यासाठी हवा असलेला व्हिडिओ निवडा (Add करा).
२. उजवीकडे Profile मधून ‘Add केलाला व्हिडिओ कोणत्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करुन हवा आहे!?’ तो फॉरमॅट निवडा.
३. Add Video च्या शेजारी असलेल्या Encode बटनावर क्लिक करा.
४. तळाला उजव्या बाजूकडे असलेल्या Output Folder बटनावर क्लिक करा.
५. अमर्याद आनंद लुटा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.