गुगल क्रोम आणि स्क्रिनशॉट

ध्यातरी गुगल क्रोम हेच माझे आवडते वेब ब्राऊजर आहे आणि मी माझ्या रोजच्या कामासाठी याच वेब ब्राऊजरचा वापर करतो. फायरफॉक्स साठी जसे निरनिराळे अ‍ॅड-ऑन असतात, त्याचप्रमाणे क्रोम वेब ब्राऊजरसाठी एक्सटेंन्शन्स असतात. या अ‍ॅड-ऑन आणि एक्सटेंन्शन्सचा उपयोग काय? तर ते आपल्या वेब ब्राऊजरची उपयुक्तता वाढवतात. आज आपण गुगल क्रोमसाठी बनलेल्या अशाच एका एक्सटेंन्शनची माहिती घेणार आहोत. या एक्सटेंन्शनचा उपयोग करुन आपल्याला इंटरनेटवरील पानांची छायाचित्रे काढता येतील. त्यालाच आपण स्क्रिनशॉट्स असं म्हणतो. 2know.in वर एखादा विषय समजावून सांगत असताना मी इंटरनेटवरील पानांच्या छायाचित्रांची मदत घेतो आणि त्यांवर काही लिहून, माझा विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ही छायाचित्रे, स्क्रिनशॉट्स अगदी सोप्या पद्धतीने कशी घेता येतील? ते आज आपण पाहणार आहोत.

गुगल क्रोम वेब ब्राऊजरचे ऑसम स्क्रिनशॉट्स एक्सटेंन्शन

(नोंद: हा संपूर्ण लेख लिहून झाल्यानंतर ऑसम स्क्रिनशॉट्सची सुविधा फायरफॉक्स वेब ब्राऊजरसाठी देखील उपलब्ध असल्याचं मला आढळून आलं. फायरफॉक्स साठी ऑसम स्क्रिनशॉट अ‍ॅड-ऑन ची लिंक या लेखाच्या शेवटी देत आहे.)
निरानिराळ्या हजारो एक्सटेंन्शन्सचा समावेश असणारे गुगल क्रोमचे स्वतःचे असे वेब स्टोअर आहे. गुगल क्रोम वेब ब्राऊजरचा कोणताही नवीन टॅब ओपन केल्यानंतर कदाचीत आपल्याला कधी Chorme Web Store अशी लिंक दिसलीही असेल. त्यात एक्सटेंन्शनसाठी स्वतंत्र असा विभाग आहे. यातील प्रत्येक एक्सटेंन्शनची आपली अशी एक वेगळी उपयुक्तता आहे.
इंटरनेटवरील पानांचे स्क्रिनशॉट्स काढण्यासाठी या क्रोम वेब स्टोअर मध्ये तशी अनेक एक्सटेंन्शन्स आहेत, पण ‘ऑसम स्किनशॉट’ हे त्यांमध्ये एक साधे-सोपे आणि अतिशय चांगले असे एक्सटेंन्शन आहे. या एक्सटेंन्शनचा वापर करुन आपण इंटरनेटवरील पानांची छायाचित्रे काढू शकतो, विशिष्ट भाग रेखांकित करु शकतो आणि त्यांवर लिहू देखिल शकतो. लिंक – Awesome Screenshots: Capture and Annotate.
ऑसम स्क्रिनशॉट
वर दिलेल्या लिंकवर गेल्यानंतर आपण ‘ऑसम स्किनशॉट’ या एक्सटेंन्शन संदर्भात असलेल्या पानावर आला असाल. या पानावर त्या एक्शटेंन्शन बाबतची माहिती, मतं, रेटिंग, हे एक्शटेंन्शन कसं काम करतं? त्यासंदर्भातील स्क्रिनशॉट्स, अशी एकंदरीत सर्व माहिती मिळेल. आता त्या स्क्रिनशॉटच्या नावासमोरील Add To Chrome या बटणावर क्लिक करा. काही क्षणातच या स्किनशॉटचा एक छोटासा आयकॉन आपल्याला आपल्या क्रोम वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारच्या रांगेत उजव्या बाजूला दिसू लागेल. फायरफॉक्सप्रमाणे त्यासाठी बेब ब्राऊजर पूर्णपणे बंद करुन चालू करण्याची काही गरज नाही.
खाली देत असलेला ५५ सेकंदांचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला ऑसम स्क्रिनशॉट बाबत समजण्यास अधिक मदत होईल. हे एक्सटेंन्शन नक्की कसं काम करतं? हे शब्दांत सांगण्यात अर्थ नाही. त्यासाठी हा खालील व्हिडिओ पहावा आणि त्याप्रमाणे आपण हे एक्सटेंन्शन पडताळून पहावे.
फायरफॉक्स वेब ब्राऊजरसाठी ऑसम स्क्रिनशॉट या अ‍ॅड-ऑन ची लिंक – Awesome Screenshot for Firefox.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.