पासवर्ड तयार करा

काल आपण स्क्रिन नेम, युजरनेम तयार करण्याविषयी माहिती घेतली आणि आज आपण माहिती घेणार आहोत ती स्ट्रॉंग पासवर्ड तयार करण्याबाबत, म्हणजेच पासवर्ड जनरेटर, पासवर्ड क्रिएटर बाबत. बर्‍याचदा आपले पासवर्ड हे असे असतात जे आपल्याच आसपासच्या व्यक्तींपासून, गोष्टींपासून प्रेरणा घेऊन ठेवलेले असतात. अशावेळी ते तितकेसे भक्कम असत नाहीत. आपली ऑनलाईन प्रायव्हेट डायरी असेल, तर त्यासाठीही भक्कम पासवर्डची गरज आहेच.

पासवर्डवरुन लक्षात आलं, मध्ये माझ्या एका मित्राचे ‘गुगल अकाऊंट’ हॅक झाले होते. म्हणजे हॅकर्सनी अगदी हुबेहुब ऑर्कुट सारखं पेज तयार केलं होतं आणि तिथे जर तुम्ही लॉग-इन झालात की, संपलंच मग सगळं! पण यावेळीही गुगलच्या सोयीसुविधा त्याच्यासाठी धावून आल्या. म्हणजे त्याचं अकाऊंट हॅक जरुर झालं! पण त्याचं त्याला ते परतही मिळालं! कसं काय!? त्याने गुगल अकाऊंट्सला आपला मोबाईल नंबरही दिला होता. त्याने मोबाईलच्या सहाय्याने आपला पासवर्ड रिसेट करुन आपलं अकाऊंट परत मिळवलं. ऑनलाईन अकाऊंट आणि आपला मोबाईल नंबर हे दोन्ही एकाच वेळी चोरीला तर जाऊ शकत नाहीत ना! आणि म्हणूनच मला वाटतं, सावधानतेचा उपाय म्हणून प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर गुगलला देऊन ठेवावा.

बाकी आता जास्त वेळ न घालवता आपण पासवर्ड तयार करणार्‍या वेबसाईट्सची माहीती घेऊयात.

१. passwordbird.com :
पासवर्ड बर्ड ही वेबसाईट पासवर्ड तयार करण्यासाठी फारच उपयुक्त वेबसाईट आहे. आणि एखादा पासवर्ड तयार करत असताना तुम्ही जरुर या वेबसाईटची मदत घ्यावी असं मला वाटतं. तिथे तुम्ही एखादं आवडीचं नाव, आवडीचा शब्द, आवडती तारीख देऊन Creat Password! वर क्लिक करता, आणि क्षणात तुमच्यासमोर तुमचा नवीन पासवर्ड हजर होतो, जो लक्षात ठेवण्यासही सोपा जाईल.

२. strongpasswordgenerator.com :
ही आणखी एक वेबसाईट आहे जी तुम्हाला याकामात मदत करु शकेल. इथे तुम्ही तुमच्या पासवर्डची लेंथ निवडता आणि Generate Password क्लिक करुन स्ट्रॉंग असा भरभक्कम पासवर्ड आपल्यासाठी तयार करुन घेता. या वेबसाईटचा उपयोग करुन तयार झालेल्या पासवर्डमध्ये कॅरॅक्टर्सचाही समावेश असेल.

३. goodpassword.com :
हा ‘बाईट्स इंटरऍक्टिव्ह’चा पासवर्ड जनरेटर आहे. हाही एक चांगला पासवर्ड जनरेटर आहे. इथे Random Password आणि Leet Password अशा दोन प्रकारात तुम्ही Password Generate करु शकता. प्रत्याक्षात त्या तिथे जाऊन ही साईट वापरुन पहा.

असेच आणखी काही पासवर्ड जनरेटर आहेत, त्यांची सलग यादी खाली देत आहे. तुम्ही जेंव्हा प्रत्यक्षात त्या वेबसाईट्सवर जाल, तेंव्हा तिथे काय करायचं आहे? ते तुम्हाला समजून येईलच!

४. freepasswordgenerator.com
५. maord.com
६. csgnetwork.com/passwordgen.html

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.