व्हिडिओ रिंगटोन मध्ये बदला

ज सकाळीच एक व्हिडिओ पहात असताना त्यातील हवा तो भाग रिंगटोनमध्ये कसा कन्व्हर्ट करता येईल!? याचा मी विचार करत होतो आणि जसं की इंटरनेटच्या बाबतीत नेहमीच माझ्याबरोबर होतं… माझी ईच्छा योगायोगाने पूर्ण झाली आणि मला एक अशी वेबसाईट सापडली की, जिथे आपण व्हिडिओचा आवाज रिंगटोन म्हणून सेव्ह करु शकतो. एखाद्या व्हिडिओमधला सलग ४० सेकंदांचा हवा तो भाग निवडून आपण आपल्या मोबाईलसाठी सुंदर अशी रिंगटोन तयार करु शकतो. हे सारं काही आपल्यासाठी शक्य केलं आहे Tube2Tone या वेबसाईटने. आणि या सुविधेचा उपयोग करुन घेण्यासाठी…

१. YouTube वरुन हवा तो व्हिडिओ निवडा आणि त्या व्हिडिओचे url कॉपी करा.
२. मग हे url तुम्ही Tube2Tone या वेबसाईटवर दिलेल्या जागेत पेस्ट करा.
३. आता व्हिडिओ प्ले होत असेल. त्या व्हिडिओतला तुम्हाला हवा असलेला भाग आला की, Record चे बटण क्लिक करा. त्यानंतर सलग ४० सेकंद तुमच्या व्हिडिओमधील आवाजाचे रेकॉर्डिंग सुरु होईल. जर तुम्हाला हवा असलेला भाग ४० सेकंदांच्या आत संपत असेल, तर तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग मध्येच थांबवू शकता.
४. शेवटी रेकॉर्ड केलेला आवाज सेव्ह करत असताना MP3, Wave, AAC, iPhone, MMF – Helio यांपॆकी एका फॉरमॅटची निवड करा.
५. बाकीच्या पर्यायांद्वारे तुम्ही तयार केलेली रिंगटोन ई-मेलने सेंड करु शकाल अथवा मोबाईलद्वारे मिळवू शकाल.

Tube2Tone ही नक्कीच एक वेगळेपण जपणारी वेबसाईट आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.