समस्त पृथ्वी, चंद्र, मंगळ आणि अवकाशाची सफर करा

आपली पृथ्वी

जकाल परदेशी प्रवास करणा-या म्हाता-यांची संख्या खूपच वाढलेली आहे. त्यामुळेच नाही का वर्तमानपत्रांची पानेच्या पाने अनेक प्रवासी कंपन्यांच्या जाहिरातींनी गजबजलेली असतात! ही झाली आजची स्थिती… पण शंभर वर्षांनंतर कदाचीत सारं चित्रच पालटलेलं असेल. त्यावेळच्या म्हाता-यांना त्यांची मुलं परदेशात नाही तर चंद्रावर फिरयला पाठवतील. पर्वाच चंद्रावर हॉटेल सुरु होणार असल्याचं मी एका वर्तमानपत्रात वाचलं. आणि मग त्यापुढील शंभर वर्षानंतर!? म्हणजेच आजपासून दोनशे वर्षांनंतरची म्हातारी माणसं डायरेक्ट मंगळाच्या दिशेनंच उड्डाण करतील. मंगळ अजून आजच्या माणसाच्या आवाक्यात नसला, तरी येत्या १५०-२०० वर्षांच्या कालखंडासाठी नासाने टप्याटप्याने मोहिमा आखल्या आहेत. त्यानंतरच्या काळात मात्र अनेक शतकं जगू शकणारा, जवळपास अमर झालेला माणूस कोटीच्या कोटी उड्डाणं घेईल… म्हातारपणास कारणीभूत ठरणा-या जिन्स्‌चा शोध लागल्यापासून सारं काही शक्य झालं आहे. पर्वाच मी एका वर्तमानपत्रात वाचलं आणि त्याआधी डिस्कव्हरी चॅनलवरही पाहलं… शास्त्रज्ञांनी एका अशाप्रकारच्या गोळीचा शोध लावला आहे की, जी रोज खाल्यावर माणसाच्या आयुष्यात अनेक वर्षांची भर पडू शकते… आणि इतर प्राण्यांवर त्याचे यशस्वी प्रयोगही करण्यात आले आहेत. मला असं नेहमं वाटतं की, आजच्या एकदम तरुण पिढीतले अनेक तरुण, लहान मुलं हे शतायु होणार! म्हणजे ते नॆसर्गीकरित्या शंभर वर्षं जगणार असं नव्हे… तर विज्ञान त्यांना जगवणार… जसं आजचे कितीतरी हार्ट पेशंट्स केवळ आधुनीक विज्ञानाच्या साहाय्याने तग धरुन आहेत.

आपला शेजारी मंगळ

हे सारं काही मानवजातीसाठी येणारा भविष्यकाळच घेऊन येईल, पण पुढे काय होणार!? त्यापेक्षा आज आपल्याकडे काय आहे!? ते अधिक महत्त्वाचं आहे. आणि आज आपल्या हातात आहे ते आपल्या संगणाकासमोर बसून, स्क्रिनला डोळे लावून, चंद्र, मंगळ आणि आपल्या पृथ्वीची सफर करणं! 🙂 नाराज व्हायचं कारण नाही… पाच वर्षांपूर्वी तुम्ही हे तरी करु शकत होतात का? त्यामुळे काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं! …हो ना!? 🙂 बाकी उपग्रहाच्या सहाय्याने आपलं स्वतःचं शहर, ओळखीचे रस्ते, आपली शाळा, दूर सोडून आलेलं घर, अंगणातली बाग, आपलं शेत, त्यातली विहिर, हे सारं काही बसल्याजागी पुन्हा एकदा डोळे भरुन पाहण्याचा आनंद हाही अगदी अवर्णनीय असाच आहे. …आणि हे सारं जे तुम्ही पहाणार आहात, ते तुम्ही ज्यांच्यासोबत जगला आहात… त्यांना बोलावून त्यांच्या सोबतच पहा… त्याने तुमची उस्तुकता, आनंद द्विगुणीत होईल.

त्यासाठी गुगलचं ‘गुगल अर्थ’ हे सॉफ्टवेअर तुमची मदत करेल. ‘भुगोल’चा आभ्यास करणा-या कोणत्याही वयोगटाच्या विद्यार्थ्यासाठी तर हे सॉफ्टवेअर म्हणजे पर्वणीच आहे. त्यांनी या बहुमोल सॉफ्टवेअरचा परिपूर्ण उपयोग करावा, असं मी आग्रहानं सांगतो.

स्वप्नांतला चंद्र

१. गुगल अर्थची पाचवी आवृत्ती ‘गुगल अर्थ ५.०’ डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घ्या.
२. गुगल अर्थ सुरु केल्यानंतर पृथ्वीचा गोल आपल्यासमोर अवतरेल. माऊसचा स्क्रोल पुढे केला की ‘झुम’ होईल, मागे केला की ‘झुम आऊट’ होईल. पृथ्वीला आपण आपल्या माऊसच्या डाव्या क्लिकने पकडू शकता आणि मग हवी तशी फिरवू शकता.
३. सॉफ्टवेअर विंडोच्या मधल्या भागात एकदम वरच्या बाजूला, ‘शनी’ ग्रहासारखा ‘भोवताली कडे’ असलेला एक छोटासा लोगो दिसेल, तिथून तुम्ही चंद्र, मंगळ, पृथ्वी, आकाश यांपॆकी जे पहायचे आहे, त्याची निवड करु शकता. नाहितर सरळ असं करा… view – explore – earth/sky/mars/moon.

बाकी तुम्ही जितका या सॉफ्टवेअरचा उपयोग कराल, तितकी तुमच्या लेखी त्याची उपयुक्तता सिद्ध होत जाईल. या सॉफ्टवेअरमध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि गुगलने त्यांच्या या सॉफ्टवेअरमध्ये आभ्यासपूर्वक भरपूर सोयी उपलब्ध करुन दिल्या आहेत. सुरुवातीला सारं काही अनोळखी आणि गोंधळात टाकणारं वाटेल… पण ‘Trial And Error’ …कधी चुक, कधी बरोबर असं करत तुम्ही सारं काही शिकत जाल. अशाप्रकारे शिकत असताना ‘गुगल’ तुमची वेळोवेळी मदत करेलच, शिवाय ‘गुगल अर्थ’चे ‘हे पान’ देखील याकामात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. ‘गुगल अर्थ’ मनोरंजन आणि आभ्यास अशा दोन्ही दृष्टीकोनातून किती विशेष आहे! याची जाणीव नक्कीच तुमच्या मनात शेवटी निर्माण होईल, त्यासाठी ‘गुगल अर्थ’चा एकदा वापर करुन पहा.

2know.in च्या पर्वादिवशीच्या लेखात आपण पाहणार आहोत एक असं सॉफ्टवेअर, की ज्याचा वापर केल्याने तुम्ही जगाच्या पाठीवर कधीही कुठेही हरवणार नाही आणि आपली वाटही चुकणार नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.