स्वस्त दरात एअरटेल ३जी

अरटेलने भारतामध्ये कोलकता आणि बेंगलोर येथे आपली ४जी सेवा सुरु केली आहे. लवकरच ते इतर शहरांमध्ये देखील ही सेवा सुरु करतील. मला वाटलं होतं ४जी सेवा ही महाग असेल, पण या सेवेचे दरही खिशाला परवडतील असेच आहेत. ४जी सेवेच्या आगमनानंतर अधिकाधीक लोकांनी ३जी सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात करावी म्हणून एअरटेलने आता आपल्या ३जी सेवेचे दर देखील मोठ्या प्रमाणावर कमी केले आहेत. तेंव्हा आपण सर्वांनी २जी ऐवजी अधुनिक अशा ३जी सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात करायला हरकत नाही.

३जी सेवेचे भारतामध्ये आगमन होऊन जरी बराच काळ लोटला असला, तरी ती जनमानसात फारशी लोकप्रिय ठरली नाही. भारतामध्ये साधारणपणे केवळ १० लाख मोबाईलधारक ३जी सेवेचा लाभ घेतात. याचं प्रमुख कारण म्हणजे ३जी सेवेचे असलेले अवास्तव दर. याशिवाय अनेक लोक बेसिक मोबाईल हँडसेट वापरतात. फोनच्या माध्यमातून संवाद साधणे इतकीच आजही अनेक लोकांची माफक आणि रास्त अपेक्षा असते. 
एअरटेलच्या अधिकृत साईटवर नमूद करण्यात आलेले ३जी प्लॅन्सचे दर मी खाली जसेच्या तसे स्क्रिनशॉटच्या स्वरुपात देत आहे. ३जी प्लॅनचे जे दर आहेत, त्यांखाली काही नियम व अटी देण्यात आले आहेत, ते देखील वाचावेत. एअरटेल ३जी चा सर्वोत्तम प्रिपेड प्लॅन २५२ रुपयांचा आहे. यामध्ये आपणांस १जीबी इतका डाटा ३जी गतीने वापरता येतो.
(नोंद: खालिल स्क्रिनशॉट मे २०१२ च्या अखेरीस घेण्यात आला आहे.)
एअरटेल ३जी चे स्वस्त दरातील प्लॅन
अधुनिक तंत्रज्ञान तरी उपलब्ध झाले, तरी ते जनमानसात रुजण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे नवीन तंत्रज्ञान हे जेंव्हा उपलब्ध होते, तेंव्हा त्याचे दर हे सामान्यांना परवडणारे नसतात. पण जसेजसे हे दर उतरु लागतात, जुने तंत्रज्ञान मागे पडून सर्वत्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरु होतो. ३जी तंत्रज्ञानाचा आणि याच्या गतीचा जर पूर्ण आनंद घ्यायचा असेल, तर आपणाकडे तसा मोबाईल देखील असायला हवा. या सर्व प्रक्रियेला काही कालावधी लागेल आणि कालंतराने एक एक करुन सर्व लोक   जेंव्हा नवीन तंत्रज्ञान वापरु लागतील, तेंव्हा ३जी तंत्रज्ञान हे २जी इतकेच लोकप्रिय आणि रुजलेले असेल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.