मोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश

नोंद - गुगलने ‘गुगल डिक्शनरी’ ही सुविधा बंद केल्याने हा लेख कालबाह्य ठरला आहे. या विषयासंदर्भात अद्ययावत लेख या इथे वाचायला मिळेल - मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश.

आपण काही ‘शे’ रुपये खर्च करुन बाजारातून शब्दकोश विकत घेतो. पण आजकाल नेटवर ऑनलाईन सर्व काही मोफत उपलब्ध आहे. अगदी मराठी - इंग्रजी, इंग्रजी - मराठी, हिंदी - इंग्रजी, इंग्रजी - हिंदी शब्दकोशसुद्धा. आणि मी मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनच भाषांबद्दल बोलतोय, कारण या तीनच भाषा बहुतेक मराठी माणसाला येत असतात. नाहितर गुगलची डिक्शनरी, शब्दकोश हा जगातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपले इंग्रजी एकदम चांगले असेल तर जगातील इतर भाषांमधील शब्द जाणून घेण्याकरता सुद्धा तुम्हाला या गुगलच्या शब्दकोशाचा खूपच चांगला उपयोग होऊ शकतो.

गुगल डिक्शनरी ही या इथे उपलब्ध आहे.
१. गुगलच्या लोगो पुढे तुम्हाला कोणती डिक्शनरी, कोणता शब्दकोश हवा आहे ते निवडता येईल. उदा. English <> Marathi म्हणजे तुम्ही इंग्रजीतून टाईप केलेल्या शब्दचा मराठी अर्थ तुम्हाला सांगितला जाईल. Marathi <> English म्हणजे तुम्ही मराठीतून टाईप केलेल्या शब्दचा  इंग्रजी अर्थ तुमच्या समोर सादर होईल.
२. आता तुम्हाला कोणत्या शब्दाचा अर्थ हवा आहे, तो शब्द समोर दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा. आणि त्याच्या समोरच असलेल्या Search Dictionary या बटणावर क्लिक करा. झालं! तुम्हाला हव्या असलेल्या शब्दाचा अर्थ तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत मिळालेला असेल.
३. प्रस्तुत इंग्लिश शब्दाचा उच्चार ध्वनीच्या स्वरुपात ऎकण्याची सोयही त्या तिथे उपलब्ध आहे.
४. इतकंच नव्हे तर त्या शब्दाशी संबंधीत Phrases ही तुम्हाला त्या शब्दाच्या अर्थाखाली पाहता येतील.
५. यानंतर त्याखाली Synonyms दिसून येतील.
६.पण अजूनही गुगलच्या शब्दकोशाचं वैशिष्ट्य संपलेलं नाही्ये! Synonyms च्या खाली त्या शब्दाची व्याख्या आपल्याला मिळेल. आणि पानाच्या उजव्या बाजूला तुमच्या शब्दाच्या समांतर शोध घेतले गेलेले काही शब्द...

उदाहरणादाखल मी एका शब्दाचे रुपांतर केले आहे, त्यासाठी खाली पहा. मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

मोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश
तर असा हा गुगलाचा शब्दकोश फारच वैशिष्ट्यपूर्ण आणि उपयुक्त आहे. हा शब्दकोश तुमची एक मोठी अडचण दूर करणार आहे हे नक्की!

blog comments powered by Disqus

2know.in - कॉपिराईट © २०१० - २०१३ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत.