खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.

Delivered by FeedBurner

व्हिडिओ रिंगटोन मध्ये बदला

ज सकाळीच एक व्हिडिओ पहात असताना त्यातील हवा तो भाग रिंगटोनमध्ये कसा कन्व्हर्ट करता येईल!? याचा मी विचार करत होतो आणि जसं की इंटरनेटच्या बाबतीत नेहमीच माझ्याबरोबर होतं... माझी ईच्छा योगायोगाने पूर्ण झाली आणि मला एक अशी वेबसाईट सापडली की, जिथे आपण व्हिडिओचा आवाज रिंगटोन म्हणून सेव्ह करु शकतो. एखाद्या व्हिडिओमधला सलग ४० सेकंदांचा हवा तो भाग निवडून आपण आपल्या मोबाईलसाठी सुंदर अशी रिंगटोन तयार करु शकतो. हे सारं काही आपल्यासाठी शक्य केलं आहे Tube2Tone या वेबसाईटने. आणि या सुविधेचा उपयोग करुन घेण्यासाठी...


१. YouTube वरुन हवा तो व्हिडिओ निवडा आणि त्या व्हिडिओचे url कॉपी करा.
२. मग हे url तुम्ही Tube2Tone या वेबसाईटवर दिलेल्या जागेत पेस्ट करा.
३. आता व्हिडिओ प्ले होत असेल. त्या व्हिडिओतला तुम्हाला हवा असलेला भाग आला की, Record चे बटण क्लिक करा. त्यानंतर सलग ४० सेकंद तुमच्या व्हिडिओमधील आवाजाचे रेकॉर्डिंग सुरु होईल. जर तुम्हाला हवा असलेला भाग ४० सेकंदांच्या आत संपत असेल, तर तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग मध्येच थांबवू शकता.
४. शेवटी रेकॉर्ड केलेला आवाज सेव्ह करत असताना MP3, Wave, AAC, iPhone, MMF - Helio यांपॆकी एका फॉरमॅटची निवड करा.
५. बाकीच्या पर्यायांद्वारे तुम्ही तयार केलेली रिंगटोन ई-मेलने सेंड करु शकाल अथवा मोबाईलद्वारे मिळवू शकाल.

Tube2Tone ही नक्कीच एक वेगळेपण जपणारी वेबसाईट आहे.


blog comments powered by Disqus

Related Posts with Thumbnails

निर्माता / लेखक

रोहन जगताप हा एक अभियंता आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने आपला कवितासंग्रह प्रकाशीत केला. डिसेंबर २००७ च्या सुरुवातीला रोहनने ब्लॉगिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि आता तो लोकप्रिय आणि नावाजलेल्या 2know.in या वेबसाईटचा निर्माता, लेखक आहे. 2know.in ही वेबसाईट इंटरनेट, मोबाईल, संगणक, विज्ञान - तंत्रज्ञान या विषयांना स्पर्श करते. आपण onlinemailme@gmail.com या ई-मेल पत्त्याद्वारे रोहन जगताप शी संपर्क साधू शकता.

पुरस्कार

पुरस्कार
स्टार माझा > ब्लॉग माझा स्पर्धा २०१० > प्रथम पुरस्कार
2know.in - Copyright © 2011 Rohan Jagtap. All rights reserved.

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP