खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.

Delivered by FeedBurner

रस्ता दाखवा, पत्ता सांगा

पल्याला संगणकावर पहायची गुगलची ‘गुगल मॅप्स्‌’ ही वेबसाईट माहित आहेच, पण आज आपण पहाणार आहोत ते गुगल मॅप्स्‌ वापरुन आपल्या मित्राला एखादा पत्ता कसा सांगायचा? किंवा एखादा रस्ता कसा दाखवायचा!?

आता कल्पना करा की, तुम्ही पुण्याचे आहात आणि तुमचा बाहेरगावचा मित्र पुण्याला येणार आहे. तो स्वतःसाठी काही चांगले कपडे खरेदी करुन लगेच आपल्या गावी परतणार आहे. सगळं काही चांगल्याप्रकारे व्यवस्थीत पार पडावं, म्हणून तो तुम्हाला त्याबाबत माहिती विचारतो. तेंव्हा तुम्ही त्याला स्वारगेटपासून जवळच असलेल्या ‘जय हिंद’ या दुकानाबाबत सुचवता. मग अशावेळी ‘गुगल मॅप्स’ वापरुन स्वारगेटहून ‘जय हिंद’ ला जायची दिशा त्याला कशी दाखवाल!? हे अगदी सोपं आहे...


१. Google Maps वर जा.
२. डाव्या बाजूला वर ‘Get Directions’ वर क्लिक करा.
३. आता A च्या समोर टाका swargate (swa करेपर्यंत खाली Swargate, Pune, Maharashtra असं आलेलं असेल, त्यावर क्लिक करा.)

गुगल मॅप्स
४. B च्या समोर Jai Hind टाका ( jai करेपर्यंत खाली Jai Hind Collections, Laxmi Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra असं आलेलं असेल, त्यावर क्लिक करा.)
५. आता Get Directions वर क्लिक करा. ‘जय हिंद कलेक्शन’ ची बरीच दुकाने असल्याने डाव्या बाजूला Did You Mean या मथळ्याखाली सर्व ‘जय हिंद कलेक्शन’ च्या सर्व दुकानांची यादी येईल. त्यापॆकी  पहिल्यावर (Laxmi Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra) क्लिक करा.
६. उजव्या बाजूला नकाशात A, B आणि निळा रंग यांच्या सहाय्याने ‘स्वारगेट’पासून ‘जय हिंद’ ला जाण्याची दिशा दाखवलेली असेल. आणि डाव्या बाजूला नकाशात दाखवलेल्या रस्त्यावरुन कारने जायला किती वेळ लागेल, ते सांगितलेले असेल.
७. आता उजव्या बाजूला वर... Send वर क्लिक करा आणि आपल्या मित्राला हा नकाशा, पत्ता मेलने पाठवून द्या.

मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा
अशाप्रकारे गुगल मॅप्स वापरुन तुम्ही आपल्या मित्राला एखाद्या ठिकाणचा पत्ता सांगू शकता, किंवा तुम्ही स्वतःच एखाद्या अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्त्याचा शोध घेऊ शकता.


blog comments powered by Disqus

Related Posts with Thumbnails

निर्माता / लेखक

रोहन जगताप हा एक अभियंता आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने आपला कवितासंग्रह प्रकाशीत केला. डिसेंबर २००७ च्या सुरुवातीला रोहनने ब्लॉगिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि आता तो लोकप्रिय आणि नावाजलेल्या 2know.in या वेबसाईटचा निर्माता, लेखक आहे. 2know.in ही वेबसाईट इंटरनेट, मोबाईल, संगणक, विज्ञान - तंत्रज्ञान या विषयांना स्पर्श करते. आपण onlinemailme@gmail.com या ई-मेल पत्त्याद्वारे रोहन जगताप शी संपर्क साधू शकता.

पुरस्कार

पुरस्कार
स्टार माझा > ब्लॉग माझा स्पर्धा २०१० > प्रथम पुरस्कार
2know.in - Copyright © 2011 Rohan Jagtap. All rights reserved.

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP