खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.

Delivered by FeedBurner

नको असलेले ईमेल फिल्टर करा

जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांपासून दूर राहणं हे कधीकधी आवश्यक बनून जातं. अगदी मोठ्या मोठ्या गोष्टींपासून ते इरिटेट करणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत! आत नको असलेले ईमेलच पहा ना! काय करायचं या ईमेल्सचं!? स्पॅम घोषीत करुन टाकायचं!? पण का!? मला मुळात ते माझ्या इन्बॉक्स मध्येच नको आहेत! अशावेळी मला काय करता येईल? त्यासाठीही एक पर्याय आहे ना! मेल फिल्टर करण्याचा! मेल फिल्टर करण्याची सुविधा मला वाटतं सर्वच ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या देतात. पण आजकाल जीमेल वापरणार्‍यांचं प्रमाण लक्षणीय आहे आणि मी स्वतः जीमेल वापरत असल्याने आपण जीमेलच्या माध्यमातून नको असलेले ईमेल्स कसे फिल्टर करता येतील!? ते पाहणार आहोत.

१. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जीमेल.कॉम वर जावं लागेल.
२. त्यानंतर वेळ येते ती नको असलेला मेल एकदा शेवटचा उघडण्याची! एख्याद्या व्यक्तिचा, संस्थेचा वारंवार येणारा, नको असलेला कोणताही एक मेल उघडा.
(मी खरं तर मी मराठी जीमेल वापरतो, पण आपल्यापैकी बहुतेक जण इंग्रजी जीमेल वापरत असल्याने काही काळासाठी मी माझ्या जीमेलची भाषा इंग्रजी करत आहे.)
३. तर आपण नको असलेला एक मेल उघडला आहे. मेलच्या वरच्या बाजूला More actions मधून Filter messages like these या पर्यायावर क्लिक करा.

More actions मधून Filter messages like these या पर्यायावर क्लिक करा
४. यानंतर नको असलेला ईमेल फिल्टर करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
५. Next Step वर क्लिक करा.
Next Step वर क्लिक करा
६. Delete it या पर्यायावर टिक मार्क करा.
Delete it पर्यायावर टिक मार्क करुन Create Filter वर क्लिक करा
७. Create Filter वर क्लिक करा.
८. तुमचा फिल्टर तयार झालेला असेल. भविष्यात जर तुम्हाला हा फिल्टर काढून टाकावासा वाटला अथवा एडीट करावासा वाटला, तर तसं तुम्ही जीमेलच्या settings या पर्यायाद्वारे करु शकता. तिथे Filters नावाचा उपपर्याय तुम्हाला दिसून येईल. त्याचा याकामात उपयोग करा.
Settings मधून Filters एडीट करा
आता इरिटेट करणार्‍या, नको असलेल्या अशा व्यक्तिचा, संस्थेचा, संघटनेचा वारंवार येणार ईमेल परस्पर डिलिट होत राहिल. आणि त्यासाठी व्यक्तिशः तुम्हाला काहीएक करण्याची गरज उरणार नाही.


blog comments powered by Disqus

Related Posts with Thumbnails

निर्माता / लेखक

रोहन जगताप हा एक अभियंता आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने आपला कवितासंग्रह प्रकाशीत केला. डिसेंबर २००७ च्या सुरुवातीला रोहनने ब्लॉगिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि आता तो लोकप्रिय आणि नावाजलेल्या 2know.in या वेबसाईटचा निर्माता, लेखक आहे. 2know.in ही वेबसाईट इंटरनेट, मोबाईल, संगणक, विज्ञान - तंत्रज्ञान या विषयांना स्पर्श करते. आपण onlinemailme@gmail.com या ई-मेल पत्त्याद्वारे रोहन जगताप शी संपर्क साधू शकता.

पुरस्कार

पुरस्कार
स्टार माझा > ब्लॉग माझा स्पर्धा २०१० > प्रथम पुरस्कार
2know.in - Copyright © 2011 Rohan Jagtap. All rights reserved.

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP