2know.in इंटरनेट, ब्लॉगिंग क्लासेस
ब्लॉगिंगबाबत शिकायचं आहे? संपूर्ण इंटरनेटबाबत माहिती हवी आहे? आपली कला, आपला आवाज असंख्य लोकांपर्यंत पोहचवायचा आहे? घरबसल्या काम करुन पैसे कमवायचे आहेत? 2know.in सारखी एक साईट आपल्यालाही बनवायची आहे? स्वतः माझ्याकडून शिका हे सर्वकाही!
नमस्कार! मी आहे रोहन जगताप, आपण आत्ता पहात असलेल्या 2know.in या साईटचा निर्माता आणि लेखक! मला खात्री आहे! ब्लॉगिंगबाबत आपण वर्तमानपत्रांमध्ये, इंटरनेटवर इतरत्र वाचलं असेल, ऐकलं असेल आणि आपल्या मनातही त्याबाबत एकप्रकारचं कुतूहल आणि उत्सुकता असेल. ब्लॉगिंगबाबत माहिती विचारणारे वाचकांचे अनेक मेल मला येत असतात. त्यांच्या प्रश्नांना मी वेळोवेळी उत्तरे देत असतो आणि त्यांच्या शंकांचे निरसणही करत असतो. पण हे शंकानिरसण त्या तात्पुरत्या एका प्रश्नाबाबत असतं आणि जर एखाद्याला ABCD अशी अगदी प्रथमपासून सुरुवात करायची असेल तर? मग अनेकजण मला विचारतात, ब्लॉगिंगबाबत आपण क्लास वगैरे घेता का? इतके दिवस तर मला त्यांना ‘नाही’ हेच उत्तर द्यावं लागत होतं. पण आता ब्लॉगिंग आणि इंटरनेटबाबत उत्सुकता असणार्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे! यापुढे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर हे ‘हो’ असं असणार आहे! मी स्वतः आजपासूनच 2know.in चे ब्लॉगिंग, इंटरनेट विषयक क्लासेस सुरु करत आहे. इतके दिवस आपण मी लिहिलेल्या लेखांच्या माध्यमातून ब्लॉगिंग, इंटरनेटबाबत शिकत होतात. आता आपल्याला थेट माझ्याशी बोलून हे सर्व काही शिकण्याची संधी आहे. आणि त्यामुळे यापुढे इंटरनेटबाबत मला जितकं येतं, तितकंच आपल्यालाही येत असणार आहे!
ब्लॉगिंग का करावे!?
खाली दिलेल्या कारणांपैकी एकही कारण आपल्याबाबत योग्य ठरत असेल! तर आपण आजच ब्लॉगिंगला सुरुवात करायला हवी!
१. छंद म्हणून, आवड म्हणून.
२. पैसे कमवण्यासाठी.
३. असंख्य लोकांपर्यंत आपला आवाज पोहचवण्यासाठी.
४. कदाचीत Tv अथवा वर्तमानपत्रात आपली दखल घेतली जाऊन आपल्याला प्रसिद्धीही मिळू शकेल.
ब्लॉगिंग मधून मला काय मिळालं!?
१. लेखन, कविता असा माझा छंद जपल्याचे, माझी स्वतःची आवड जपल्याचे आत्मिक समाधान! जे की कोणत्याही आनंदापेक्षा अधिक मोठं आणि चिरकाल टिकणारं आहे.
![]() |
| माझा उल्लेख वर्तमानपत्रात |
![]() |
| 2know.in चे नाव वर्तमानपत्रात |
![]() |
| मला मिळालेला गुगल अॅडसेन्सचा पैशांचा चेक |
![]() |
| 2know.in ला ‘स्टार माझा’ चॅनलचे प्रमाणपत्र |
ब्लॉगिंगबाबत, इंटरनेटवर इतरत्रही वाचून शिकता येतं, मग क्लासेस कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. जर एकाने आपल्याला आपल्या घराचा पत्ता देऊन घरी येण्यास सांगितलं, तर आपल्याला पत्यानुसार त्यांचं घर शोधत जावं लागेल. आणि जर तो स्वतःहून आपल्याला थेट घरी घेऊन गेला तर!? तर आपला शोधशोध करण्याचा सर्व वेळ वाचेल. इंटरनेटवर अनेक वर्ष घालवल्यानंतर मला ही माहिती मिळाली आहे. क्लासेस लावल्याने आपल्या आयुष्यातली काही वर्ष निरर्थक शोधाशोध करण्यात, माहिती पडताळण्यात वाया जाणार नाहीत. कारण रस्ता मी शोधला आहे. तो दाखवण्याचं काम आता मी करणार आहे. शाळेत असताना पुस्तकं असूनही आपण शिकवणी लावतोच ना! का? कारण आपला वेळ वाचतो, काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याला मिळतात आणि आपण यशाला लवकर गवसणी घालतो. आणि म्हणूनच आपल्याला कोणीतरी वाट दाखवणं अधिक महत्त्वाचं आहे.
किती वेळ शिकवलं जाईल?
या क्लासचा ठराविक असा कालावधी नसून, साधारण १० ते १५ तास आपल्याला लागू शकतील.
क्लासची वेळ कोणती?
आपण सांगाल ती आपल्या सोयीची वेळ. फक्त वेळेत बदल होणार असेल, तर आदल्या दिवशी सांगावे ही विनंती.
क्लासची फी किती?
क्लासची फी ही ३००० रुपये इतकी आहे. आपण जर क्लाससाठी विद्यार्थी आणून दिले, तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे आपल्याला १००० रुपये इतकी रक्कम देण्यात येईल.
हा क्लास चॅट, कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग या माध्यमातून घेण्याची सुविधा असल्याने आपण जगाच्या पाठीवर कुठेही असाल, तरी या क्लासमध्ये सहाभागी होऊन यश मिळवू शकाल.
वाचकांच्या काही प्रतिक्रिया:
गणेशजी लिहितात :
प्रिय रोहन,
सहजच नेटवर काम करीत असताना अचानक कसा तुझ्या वेबसाईटवर पोहचलो कळलेच नाही. तुझी साईट पाहून अतिशय आनंद वाटला.
आता मला मराठीमध्ये मला शोधाशोध करावी लागणार नाही
तुझे प्रगतीचे पंख स्वच्छंद आकाशात भरारी घेत राहो
ही मनोमन सदिच्छा
धन्यवाद!
गणेश धानके
आरती म्हणतात:
hi,we dont know each other......but i had see u on STAR MAZA.i had
curiocity to see ur blog...its really and appriaciating and good
work..nice to see ur cretivity.....i am student of computer
engineering at last year from poona university.wish u heartly
CONGRATS.........ANI ASHICH MARATHI MATICHI SHAAN VADHAVSAL ASA
VISHVAS VYAKT KARATE................jai Maharastra
मानसी लिहितात:
धन्यवाद,खुप् धन्यवाद!माज्या प्रश्नाचि तत्पर्तेने दखल घेत्ल्य बद्दल । आनी सोप्पे संगीतले म्हणून।मि माज्या सर्व फ़्रेन्द्स न तुमच्य ब्लोग बद्दल संगते ।परत एकदा धन्यवाद। तुमहि संगित्ल्य प्रमाणे मि करून बघ्ते।
अधिक माहितीसाठी खालिल फॉर्मच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करा. यात * केलेल्या जागा भरणं आवश्यक असून, बाकी जागा नाहीत भरल्या तरी चालेल. याशिवाय संपर्कासाठी माझा ईमेल पत्ता आहे - onlinemailme@gmail.com






