url चा मोठा आकार लहान करा

नेक url असे असतात जे संपता संपत नाहीत. आणि मग ते कॉपी करुन एखाद्या ठिकाणी पेस्ट करायचं म्हटलं, तर गॆरसोयीचं होऊन बसतं आणि ते तसं योग्यही वाटत नाही. जसं की… उदाहरणार्थ आपण गुगल मध्ये काही शब्द सर्च केले… जसं की मी आता करत आहे… “url shortener” आणि सर्च वर क्लिक केलं. आता सर्च रिझल्टस्‌ घेऊन आलेलं एक पान माझ्या समोर ओपन झालं आहे. ते पान मला माझ्या वाचकांसोबत शेअर करायचा आहे, तर मला त्या पानाची लिंक ही या इथे द्यावी लागेल. ती अशी – http://www.google.co.in/search?hl=en&ei=kdWqS6aHK4rY7APg4em-BA&sa=X&oi=spellfullpage&resnum=0&ct=result&cd=2&ved=0CAYQvwUoAQ&q=url+shortener&spell=1

आता ही लिंक तर काही संपता संपत नाही. अशास्वरुपात ही लिंक या इथे देणं, हे अगदीच बरोबर वाटत नाही. अशावेळी माझ्यासमोर दोन पर्याय आहेत १. एखाद्या शब्दाला ही लिंक जोडणं. २. url शॉर्ट करुन या इथे देणं. एखाद्या शब्दाला लिंक जोडणं सगळीकडेच शक्य होतं असं नाही. उदा. माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही एखाद्या शब्दाला लिंक जोडू शकत नाही. मग माझ्यासमोर पर्याय उरतो तो url शॉर्ट करुन घेण्याचा. त्यासाठी मी असं करेन…
url चा आकार लहान करा
१. मी is.gd या मोफत वेबसाईटवर गेलो. (लिंक शॉर्टनर / यु.आर.एल. शॉर्टनर)
२. वर जे लांबलचक यु.आर.एल. (url) दिलं आहे, ते कॉपी करुन is.gd या वेबसाईटवर दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये पेस्ट केलं.
३. Compress That Address! या बटणावर क्लिक केलं.
४. आणि आता माझे लांबलचक url लहान झाले आहे. आधीचे मोठे url १४० कॅरॅक्टर्सचे होते, ते आता फक्त १८ कॅरॅक्टर्सचे झाले आहे. म्हणजे ८८% कॅरॅक्टर्स कमी झाले आहेत.
ही आहे त्या लहान झालेल्या url ची लिंक http://is.gd/aXJjK , जी तुम्हाला url शॉर्ट करुन देणार्‍या आणखी काही वेबसाईट्सकडे घेऊन जाईल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.